राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आल्या आसता पाथरी मतदार संघातील शिक्षण विभागा संदर्भातील काही मागण्या मांडल्या व त्या सोडवण्या बाबत ना.वर्षाताई गायकवाड यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. परभणी जिल्हा शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी शिक्षक रिक्त पदे, ऑनलाईन शिक्षण, निजामकालीन ना दुरुस्त शाळा बांधकाम, डिजिटल शाळा इत्यादी सर्व विषयांवर चर्चेला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली. या बैठकीला जिल्ह्यातील विधानसभा सदस्य सुरेश वरपुडकर, मेघना बोर्डीकर, जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी, जि. प. सदस्या भावना नखाते, जिल्हाधिकारी दिपक मुंगळीकर, मु.का.अ.जि.प.बी.पी पृथ्वीराज, शिक्षणाधिकारी वाव्हळ मॅडम, शिक्षणाधिकारी प्राथमिक पाटेकर मॅडम व संबंधित अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी – उमेश मुरकर