शम्स आलम यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट क्रीडा व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार मिळाला

मुंबई : आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू शम्स आलमला शुक्रवारी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय सर्वोत्तम क्रीडा व्यक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिल्ड, प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शम्स हा बिहारचा पहिला पॅरा जलतरणपटू आहे, ज्याला २०२० साठी राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट क्रीडा व्यक्ती पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने २६ ऑक्टोबर रोजी ही घोषणा केली.
शम्स ने शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसीओएशन ( SSKKA ) या संस्थेतून कराटे व किक बॉक्सिंग या कलेचे प्रशिक्षण शिहान उमेश मुरकर याच्या मार्गदर्शना खाली घेऊन सन २००८ त्याने आपला ब्लॅक बेल्ट मिळविला. शम्स याने विविध राज्यस्तर, राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्पर्धेत तसेच युनिव्हर्सिटी कराटे स्पर्धेत सुवर्ण पदके पटकविले आहेत. सदर पुरस्कार संबंधी बोलताना त्याने सांगितले कि मी शिकलेल्या कराटे या कले मुळेच व केलेल्या परिश्रमा मुळे जीवनात आलेल्या कठीण काळात मी स्वतःला सावरू शकलो. आजही मी माझ्या प्रशिक्षक उमेश मुरकर व एस एस के के एसंस्थेशी कृतघ्न राहून संस्थेच्या खेळाडूंना माझ्या चांगल्या वाईट अनुभवातून मार्गदर्शन करीत आहे, व पुढेही हे कार्य माझ्याकडून चालू राहील.
शम्स आलम याला २९ऑगस्ट २०२१ रोजी पाटणा येथील प्रेमचंद रंगशाळा येथे बिहार खेल सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. शम्स नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलंड ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये सामील झाला. ज्यामध्ये ५० मीटर बटरफ्लाय स्विमिंगमध्ये S-5 प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय विक्रम केला. समाज कल्याण विभागाकडून २०२० मध्ये जागतिक अपंग दिनानिमित्त शम्स यांना बिहारचा रोल मॉडेल पुरस्कार मिळाला. पॅरा स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शम्सने २०१९ मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये, पाटणा येथे बिहार जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या मिश्रीलाल स्मृती ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये शम्सने १२ मिनिटे२३ सेकंदात दोन किलोमीटर पोहणे पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने शम्स यांची ब्रँड अँबॅसिटर म्हणून निवड केली. ऑगस्ट २०१७ मध्ये पाटणा येथे झालेल्या व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिपमध्ये शम्स बिहार संघाचा कर्णधार होता. जकार्ता, इंडोनेशिया येथे आशियाई पॅरा गेम्स २०१८ मध्ये भाग घेतला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com