निर्मला मेमोरियल फाउंडेशन ज्युनिअर कॉलेज तर्फे मुलींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : निर्मला मेमोरियल फाउंडेशन ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, कांदिवली येथे दि . १६ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता कनिष्ठ महाविद्यालयीन मुलींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्य शाळेसाठी कराटे, किक बॉक्सिंग प्रशिक्षक उमेश मुरकर यांना मुलींना प्रशिक्षण देण्याकरिता सदर संस्थे तर्फे आमंत्रित केले होते. त्याच बरोबर विघ्नेश मुरकर, भूपेश वैती यांनीही मुलींना स्वरक्षणाचे डावपेच व त्यांच्याकडून सराव करून घेतला, या प्रशिक्षण वर्गात मुलींना विविध मार्शल आर्ट जसे कराटे किक बॉक्सिंग जुडो या खेळाबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले, व आपत्ती काळात मुलींना कसे स्वरक्षण करावे तेही कोणतेही शस्त्र साहित्य नसताना स्वरक्षण कसे करावे याबद्दल माहिती व त्यांच्याकडून प्रात्यक्षिकासहित सराव करून घेतला, याप्रसंगी बोलताना उमेश मुरकर म्हणाले की संपूर्ण जगभरात भारत देश हा आपणास आपली संस्कृती परंपरा अध्यात्म यामुळे ओळखला जातो, भारतात तर महिलांना आदिशक्तीचे रूप मानले जाते, मुळातच भारतीय महिला ही कधीही अबला नव्हती, अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलैकिक वाढविला आहे. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. याच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निर्मला मेमोरियल फौंडेशन जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या संचालक- अरुणाबेन देसाई, शैक्षणिक संचालक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य- सिल्व्हिया फर्नांडिस, उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे आयोजक – शशी यादव, अँकर- विदुला सावे, महिला विकास कक्षाच्या सदस्य- वैशाली मिश्रा, ममता जोशी, फोरम शहा यांनी पुढाकार घेऊन स्वरक्षण कार्यशाळा आयोजित केली होती

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com