विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वाॅरंट जारी

वीज दरांमध्ये वाढ केल्याने बेस्ट महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात आंदोलनावेळी त्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात जामीनपात्र वाॅरंट जारी केले आहे. या संबंधित प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, खटला आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे. मात्र, नार्वेकर व लोढा खटल्याला अनुपस्थित राहात असल्याने आरोप निश्चितीची प्रक्रिया खोळंबली आहे.
तर रद्द होणार वाॅरंट
सर्व आरोपी गैरहजर राहिल्याने आरोपी भाजपचे आमदार आहेत की मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत, हे न्यायालय तपासू शकले नाही. विधानसभेच्या पुढील वेळापत्रकाबाबत बैठक सुरु असल्याने नार्वेकर विधानसभेत आहेत. त्यामुळे त्यांना 15 मिनिटे उशीर होईल, अशी माहिती शुक्रवारी नार्वेकरांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. त्यावर मी काय करावे, तुम्हीच सांगा. मी पुरेशी संधी दिली. त्यांना काॅल करु बोलवा, आम्ही वाॅरंट रद्द करु , असे म्हणत न्यायालयाने नार्वेकर व लोढा यांच्यावर जामीनपात्र वाॅरंट जारी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com