सध्या ब्रेक द चैन चालू असल्याने बरेच लोक घरी आहेत व जागे अभावी त्यांची वाहने रस्त्यावर कुठेही पार्क करून ठेवण्यात आलेली आहेत त्यामुळे वाहन चोरीच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. धारावीतील सर्व नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातुन गाड्या चोरीचे गुन्हे घडत असल्याची चेतावणी वजा पूर्व सूचना करून अंजली वाणी – गुन्हे प्रकटीकरण अधिकारी धारावी पोलीस ठाणे यांनी केली आहे. तसेच सर्वांनी आप आपली वाहने व्यवस्थित पार्क करून ठेवावीत तसेच शक्य असल्यास सर्वांनी आपल्या वाहनांना GPS tracker बसवून घ्यावा अशी विनंती हि त्यांनी नागरिकांना केली आहे.