ठाणे : डोंबिवीकरांना गेले काही दिवस कासाबेला, कासाबेला गोल्ड तसेच रिओ मधील गटारांची झाकणे गायब होत होती. त्यात पडण्याचा धोका होता. मॅग्निफिका सोसायटी मधील गटाराचे झाकण चोरीला गेल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी बरेच तास CCTV फुटेज तपासले. एक व्यक्ती दि. ४.८.२०२१ रोजी दिवसाढवळ्या गटाराचे झाकण चोरून दुचाकी (MH05 DN 3270) वरून नेताना दिसली. ही गोष्ट कासाबेला च्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाला कळविण्यात आली, तसेच फेडरेशनच्या सुरक्षासमिती चे प्रमुख शुभम मिश्रा तसेच कासाबेला मेन गेट सिक्युरिटीचे शनिदास पाटील, दत्ता पाटील, फुलाजी पाटील यांनी व्यक्तीशः लक्ष घालून पाळत ठेवली.
काल संध्याकाळी गोल्ड च्या श्रीमती विमल यांनी अनोळखी व्यक्तीस झाकण उघडताना पाहिले आणि आधीच सावध असलेल्या बाऊंसर सिद्धार्थ याने त्याला गोल्ड पासून मॉल पर्यंत पाठलाग करून पकडले. शुभम, शनीदास यांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. त्याने आपल्या चोरीची कबुली दिली. तसेच नशेसाठी चोरी करत असल्याचे सांगितले. पोलिसांना बोलावून त्याला रीतसर मानपाडा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. या संदर्भात इकबाल पठान हेड कांस्टेबल यांचे सहकार्य मिळाल्या बद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.
सावधानतेने या घटनेचा पाठपुरावा केल्याबद्दल कासाबेला व गोल्ड च्या रहिवाशांकडून या सर्वांचे कौतुक होत आहे.

