कानपूर: वृत्तसंस्था अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्याविरोधात आयकर विभागाने सुरू केलेली कारवाई देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. जैन याची चौकशी सलग ५० तास चालली. अखेर करचुकवेगिरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. जैन याच्या कनौज येथील घरात १८ लॉकर्स सापडले आहेत. ५०० चाव्यांचा जुडगाही सापडला आहे. जैन याच्या ४० कंपन्यांचीही माहिती आयकरला मिळाली आहे. तब्बल १२० तास ही कारवाई चालली. हाती लागलेली बेहिशेबी संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले. जैनकडे २५७ कोटी रुपये तर रोख स्वरूपात आढळले. सापडलेल्या कागदपत्रांतून अन्य १६ संपत्तींबाबत माहिती उपलब्ध झाली. त्यापैकी कानपूरमध्ये ४, कनौजमध्ये ७, मुंबईत २, तर दिल्लीत १ आहे. विशेष म्हणजे दुवईतही दोन मालमत्ता आहेत.