मुंबई : पोलीस अभिलेखावरील तडीपार गुड वाहिदअली आबिदअली बागवान (२२) याला धारावी पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह धारावी कावळे चाळ येथील हेरिटेज इमारतींसमोरील मोकळ्या मैदानातून मोठ्या शिताफीने अटक केली. सादर कारवाईत राजेश चंदनशिवे, अशोक साबळे, केदरलींग कोकने, दत्तात्रय आव्हाड, गजानन बागले, राजेश शिंगटे, अनिल शिंदे या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला. वाहिदअली आबिदअली बागवानवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि अमोल चव्हाण अधिक तपास करत आहेत. धारावी नव्वद फूट रस्त्यावरील साईबाबा नगर परिसरात राहणारा वाजिदअली पोलीस अभिलेखावरील सराईत गुंड असून त्याची विभागात दहशत आहे. त्याच्या नावावर मारामारी, खंडणी तसेच जीवघेणा हल्ला करण्याच्या अनेक तक्रारी दाखल असल्याने त्याला परिमंडळ – ५ उपायुक्तांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. असे असताना तो आपली दहशत राखून ठेवण्यासाठी अधूनमधून धारावी नव्वद फूट रोडवरील झोपडपट्टीत येत होता.
प्रतिनिधी – उमेश मुरकर