नवी मुंबईतील बांगलादेशी “नागरिकांविरोधात विशेष मोहीम

बांगलादेशातून घुसखोरी करून नवी मुंबई शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याची मोहीम नवी मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी तुर्भे येथील के. के. आर रोड, नेरूळ येथील दारावे आणि करावे गाव भागात छापे मारून १२ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यात ८ महिलांचा व ४ पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील एका महिलेकडे नालासोपारा येथील आधार कार्डची झेरॉक्स कॉपी असल्याचे आढळून आले आहे.

नवी मुंबई पोलिसांनी या सर्व बांगलादेशी नागरिकांविरोधात पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तुर्भे स्टोर येथील के. के आर रोड परिसरात काही घुसखोर बांगलादेशी महिला बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची काही माहिती तुर्भे वै एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने के. के. आर. रोड परिसरातील संशयीत घरावर छापा मारला. यावेळी सदर घरामध्ये शायना इचारअली शेख (४०), नर्गिस मोहमद दिनाला गाझी (४२) आणि मोदींना रूफलमिया शिखदर (२३) या महिला आढळून आल्या. नेरुळ सेक्टर-२३ मधील दारावे गावातील एका संशयायीत घरावर छापा मारला असता यावेळी सदर घरामध्ये तानिया वसीम शेख (२६), नईमा अख्तर अलीयार शेख (१९), डॉली शमीम खान (२५), हसनूर हनीफ मोडल (३१), टुटूल अस्लम शिखदार (२२), आखी हमीद मोंडल (२२), राजूर मो. हमीदुल शहा (३७) आणि मोनाहार अब्दुल जॉली (२८) हे चार महिला व चार पुरुष बेकायदेशीररित्या रहात असल्याचे आढळून आले. नेरुळ पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले.
नेरूळमधील करावे गावात नितीन पाटील यांच्याकडे भाड्याने घर घेण्यासाठी डोलिना साहेब खान ही गेली होती. याबाबतची माहिती देण्यासाठी नितीन पाटील हे एनआरआय पोलीस ठाण्यात माहिती देण्यासाठी गेले होते. पोलिसांनी त्या महिलेबाबत अधिक चौकशी केली असता, ती बांगलादेशी असल्याची माहिती मिळाली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com