दिनांक १८फेब्रुवारी रोजी भारत नगर, कुंभारवाडा रोड, धारावी मुंबई १७ येथे राहणाऱ्या बालाजी सूबरमन्यम यांनी धारावी पोलीस ठाणे येथे येवुन सांगितले की, त्यांच्या कडुन चुकुन ५ लाख रूपये रूपये खाते क्रमांक 03440154984 वर गेले असल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा तत्काळ पो.उ.नि. सागर खाडे सायबर अधिकारी यांनी तक्रारदारांच्या बॅंकेस पत्रव्यवहार करून नमुद खाते क्रमांक ची माहिती मागवतली असता ती आय सि आय सि आय बॅंक, शाखा -अहमदाबाद, गुजरात अशी प्राप्त झाल्याने त्यांनी सदर बॅंकेस पत्रव्यवहार करून नमुद चे खाते डेबिट फ्रिज केले. व तक्रारदारांचे ५ लाख रूपये मिळण्याकरिता आय सी आय सी आय बँकेस पत्रव्यवहार करून आज दिनांक २०/०२/२०२३ रोजी तक्रारदारांचे ५ लाख रूपये त्यांच्या खातेवर मिळवुन दिले. या संबधी सदर माहिती विजय कांदळगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे, मुंबई यांनी प्रसारित केली