मुंबई: सिगरेट व दारू पिण्याच्या शुल्लक कारणावरून मनात राग ठेवून सीएसएमटी स्थानकात हमालीचे काम करणाऱ्या अमोल पठारे (वय 25) याला त्याच्याच सहकारी मित्र जुबेर सय्यद (वय 26) व तुषार नारकर (वय 36) या दोघांनी मिळून धारदार सुरा व एक मोठ्या दगडाने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ता.2 जुलै रोजी सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 16 व 17 च्या जवळ घडली आहे. यात फिर्यादी अमोल पठारे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी जुबेर सय्यद (वय 26) व तुषार नारकर (वय 36) या दोघांना गुप्त बातमीदारांच्या सहकाऱ्याने सीएसएमटी लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून सीएसएमटी परिसरातून अवघ्या 24 तासात अटक केले असून या दोघांना न्यायालयात हजर केले असता ता.7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सीएसएमटी लोहमार्ग पोलीस निरीक्षक मनोजकुमार माने करत आहेत.
पंचनामा प्रतिनिधी विवेक साळवी