मुंबईतील रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुखच्या मुलाची एनसीबीकडून चौकशी

मुंबई – शनिवारी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) जप्त केले आहेत. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीतील १० जणांना ताब्यात घेतले आहे, ज्यांपैकी एक बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा आहे अशी माहिती समोर आली आहे. मुंबईहून हे क्रूझ जहाज गोव्याकडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. या पार्टीत प्रवेशासाठी प्रत्येक व्यक्तीने ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये काही नामवंत उद्योगपतींच्या मुलींचा समावेश आहे. दरम्यान आता एनसीबी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.


यासंदर्भात इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री मुंबई किनारपट्टीवर झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एनसीबीने क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही बोलावले आहे. एनसीबीने आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसेच क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत.

ठोस माहिती मिळाल्यानंतर, मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकारी सामान्य प्रवासी म्हणून जहाजावर चढले होते. मुंबई सोडल्यानंतर जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच रेव्ह पार्टी सुरू झाली. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. एनसीबीने सात तास तपास करत. बॉलिवूड कलाकाराच्या मुलासह १० लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर सर्वांना मुंबईत आणण्यात आले.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सात तासांच्या छाप्यादरम्यान चार प्रकारचे ड्रग्स सापडली आहेत. यामध्ये एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस यांचा समावेश आहे. मात्र, तपास अद्याप सुरू आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी प्रवासी क्रूझवर छापा टाकण्यात आला, जिथे पार्टी चालू होती आणि त्यात ड्रग्जचे सेवन केले जात होते. हे जहाज गोव्याला जाणार होते आणि त्यावर शेकडो प्रवासी होते. जहाजावर पार्टी असल्याची माहिती मिळताच एनसीबीच्या पथकाने छापा टाकला. काही प्रवाशांकडून प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com