धारावीत अल्पवयीन मुलावर लैगिक अत्याचार

धारावी पोलीस ठाणे येथे दिनांक ०५/११/२०२० रोजी फिर्यादी श्रीमतीं शाहीना (नाव बदलले आहे) यांनी कोणीतरी अनोळखी इसमाने त्यांच्या अल्पवयीन मुलावर लैगिक अत्याचार केल्याबाबत फिर्याद दिल्याने नमुद अनोळखी इसमाविरूध्द गु.नों.क्र. ४६७/२०२० कलम ३७७, ३६३ भा.दं. वि. सह कलम ४, ६, ८, १०, १२ पोस्को कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयामध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच स्थळपुरावा प्राप्त नसतांना देखील घटनास्थळाच्या आजुबाजुस असलेल्या सि.सि.टी.व्ही. फुटेज तसेच गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीवरून नमुद गुन्हयातील विधिसंघर्षग्रस्त बालक सुनिल, वय १४ वर्षे ( नांव बदललेले आहे ) यास धारावी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी कसुन शोध घेवुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले. नमुद विधिसंघर्षग्रस्त बालकाकडे कसुन केलेल्या चौकशीमध्ये त्याने नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, श्री. प्रणय अशोक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, मुंबई, श्री. विजय धोपगांवकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, माहिम विभाग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रमेश नांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे, श्री. जिवन खरात, पोलीस निरीक्षक (प्रशासन), श्री. विजय माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अनंत अहिरे, सहा. पोलीस निरीक्षक, श्रीमती अंजली वाणी, म.पो.उप.नि., श्री. बालाजी कटके, पो.ना.क्र. ३११२१, श्री. लक्ष्मण झडे, पो.ना.क्र. ०१६८, श्री. संतोष वारिक, पो.शि.क्र. ०४०१७६, श्री. आशिष सुर्वे, पो.शि.क्र. ०६१९२४, श्री. राहुल पाटिल, पो.शि.क्र. ०८०१०२ यांनी अथक परिश्रम घेवुन पार पाडली व सदर क्लिष्ट गुन्हा ७२ तासाच्या आत उघडकीस आणला आहे प्रतिनिधी – रघुनाथ गायकवाड

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com