धारावीत प्रतिबंधित कोरेक्स च्या बाटल्या जप्त

धारावी : धारावी नव्वद फूट रस्त्यावरील सावरीया फालुदा गल्लीत धारावी पोलिसांनी गस्ती दरम्यान हजारो रुपयांचा प्रतिबंधित कोरेक्स च्या १९२ बाटल्यासह एका तस्कराला बुधवारी अटक केली. भीमराव कल्लापा पूजारी, वय 30 वर्षे असे त्याचे नाव आहे. पोलीस त्याच्या दोन फरार साथीदारांचा शोध घेत आहेत.
धारावी पोलीस ठाण्याचे पो. शि. राजेश चंदनशिवे हे गस्त घालत असताना सावरिया फालुदा गल्लीत दोन जण व महिलेची संशयास्पद हालचाल सुरु होती. याची माहिती त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण याना दिली. या घटनेची त्वरित दखल घेऊन स.पो.नि. अमोल चव्हाण यांनी पो. शि. अशोक साबळे, बाळासाहेब डिंबळे, बगळे, दत्ताराम आव्हाड यांच्या सोबत घटनास्तळी पोहचून त्यांच्याजवळील एका प्लॅस्टिकच्या निळ्या थैलीतील वास्तूच्या संदर्भात पोलिसांनी त्यांना हटकले. ते पाहून घाबरलेली महिला व एकाने पळ काढला. दरम्यान हातात थैलीचे ओझे असलेला पोलिसांच्या हाती लागला. त्या थैलीत कोरेक्सच्या १०० मिली. च्या १९२ वाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्या जप्त करून त्याला ताब्यात घेतले. व त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव भीमराव कल्लापा पूजारी, वय 30 वर्षे असे सांगितले. त्या नंतर त्याच्याकडे असणार्या पिशवी मध्ये काय आहे असे विचारले असता त्याने त्याच्या पिशवी मध्ये क्लोरोफनेईरामी ने मलाते अँड कोडईन फोस्फट सिरप- फेन्सिंरेस्ट कफ १०० एम एल नावाचे (Corex) औषधी द्रव्य असल्याचे सांगितले. सदर औषधी द्रव्यास विक्री व वापर करण्यास व ते गुंगीकरक असल्याने मनाई आहे. सदर द्रव्य हे पंचनामा मध्ये ताब्यात घेण्यात आले. सदर पिशवी मध्ये १९२ बाटल्या मिळून आल्या. एक बाटलीची सद्या बाजारामध्ये १०८ रुपये किंमत आहे. ऐकून १९२ बाटल्याची किंमत ही २०,७३६/- रुपये असल्याचे निदर्शनास आले. नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर धारावी पोलीस ठाणे वि.स्था.गु.नों.क्र ४३/२१ कलम ८(क), २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com