संरक्षित प्राणी, व्हेल माश्याच्या उलटीची (Ambergris) बेकायदेशिर व्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई : व्हेल माश्याची उलटी (Ambergris) हा पदार्थ व्हेल माश्याच्या पोटात तयार होतो. नमुद पदार्थाचा वापर हा अति उच्च प्रतिचा परफ्युम, औषधे, सिगारेट, मदय, तसेच खादय पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्याकरीता देखील करण्यात येतो.

दिनांक २३/०६/२०२१ रोजी काही इसम हे संरक्षित प्राणी व्हेल माश्याच्या उलटीची (Ambergris), जिचे खरेदी /विक्रीवर शासनाने बंदी आणलेली आहे, ती वस्तु बेकायदेशीर रित्या विकण्याकरीता वरील नमुद परिसरात येणार असल्याच्या मिळालेल्या माहितीची अनुषंगाने वर नमुद ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्यात आली असता सदर कारवाईमध्ये वर नमूद गुन्हयातील २ आरोपींकडे वर नमुद वर्णनाचे व किंमतीचे Ambergris हे बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे मिळून आले. सदरबाबत सविस्तर पंचनामा करुन उपरोक्त नमुद २ आरोपी व मुददेमाल ताब्यात घेवून सदरबाबत ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे वर नमुदप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असून गुन्हे शाखेकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

सदर गुन्हयातील आरोपी क्र. १ हा बृहन्मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होता. त्यास पायधुनी पोलीस ठाणेस कार्यरत असतांना, सन २०१६ मध्ये शासकीय सेवेतुन कमी (बडतर्फ) करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस. वीरेश प्रभु, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. प्रकाश जाधव, मा. सहाय्यक पो. आयुक्त, प्रकटीकरण-मध्य श्री. नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष ३ चे प्रपोनि सोपान काकड, पो. नि निसर्ग ओतारी, सपोनि, प्रकाश लिंगे, पोउनि सिद्धेश जोष्टे, वनरक्षक श्री. झुगरे, श्री. मन्सुरी, पंच, पोना युवराज देशमुख, पोना भास्कर गायकवाड, पोशि चंद्रकांत काळे, पोशि मंगेश शिंदे, पोशि. राहुल पाटील व पथक यांनी पार पाडलेली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com