पोलीस असल्याची बतावणी करणारा सराईत गुन्हेगार कुळगाव पोलीसांच्या जाळ्यात, सोन्याच्या दागिन्यांसह नामांकित कंपनीचे १५ मोबाईल हस्तगत

मुंबई : एका महिन्यांपूर्वी कुळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून एका वृध्द महीलेस गंडा घालून तिच्या गळयातील सोन्याची चैन घेऊन पोबारा करणाऱ्या भामट्यांला जेरबंद करण्यात ठाणे जिल्ह्यातील कुळगाव पोलिसांना यश आले आहे. हैदर तेहजीब सैय्यद ईराणी राहणार आंबीवली असे या आरोपीचे नाव असल्याची माहिती कुळगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, मुरबाड उप विभागीय पोलीस अधिकारी
डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनी गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाच्या मदतीने तसेच गुप्त बातमीदार व तांत्रिक बाबीच्या आधारे आरोपी हैदर तेहजीब सैय्यद ईराणी राहणार आंबीवली स्टेशन जवळ पाटीलनगर यास अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता कुळगाव पोलीस ठाणे, कल्याण पोलीस ठाणे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तसेच कुळगाव पोलीस ठाणे येथे दाखल गहाळ मोबाईलचे शोध घेवुन नामांकित कंपनीचे एकुण 15 मोबाईल मिळुन आले असून सदरचे मोबाईल पुणे, वाडा, परळी, सांगली, वांगणी, कर्जत येथुन हस्तगत करण्यात आले आहेत. या तपासात एकुण 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या तपासाठी पोलीस उप निरीक्षक भरत सोनवणे, फौजदार वामन कामडी, पोलीस हवालदार स्वेता निमगडे, पोलीस नाईक विनोद ठाकुर, जितेंद्र वारके, शैलजा भोईर, पोलिस शिपाई संदीप पाटील, गोरक्षनाथ घोडके, सोमनाथ घरटे, आव्हाड, पोलीस हवालदार भोईर, पोलीस नाईक जाधव, वैशाली आसवले, शोभा भोईर, स्मिता भगत, देवा निरगुडा यांनी पोलिसांनी विशेष मेहनत घेतली आहे. दरम्यान तपासातील हस्तगत वस्तूं संबंधित तक्रारदारांची शहानिशा करून त्यांच्या वस्तू त्यांना शनिवार, ता.3 जुलै रोजी सहायक पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com