मुकेश गुप्ता, जितेंद्र गुप्ता आणि नटखट उर्फ प्रिन्स कुमार या तीन प्रॅंक युटूबरला अश्लील व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून असुरक्षिततेच्या फैलाव केल्या मुळे मुंबई पोलिसांनी अटक केली

मुंबई : मुंबई क्राईम ब्रान्वच्या सायबर पोलिसांनी यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या तिघांना अटक केली आहे. क्राईम ब्रान्चचे सहआयुक्त मिलिंद भरांबे यांनी सांगितलं की, हे लोग प्रॅन्कच्या नावावर अश्लील व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड करायचे, ज्याद्वारे त्यांनी बक्कळ पैसा कमावला होता. एकीकडे लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या, त्यावेळी या आरोपींनी हे अश्लील व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करप्यास सुरुवात केली. लॉकडाऊन काळात या लोकांना सुमारे दोन कोटी रुपये कमावले. हे आरोपी प्रँक व्हिडीओच्या नावावर अश्लील व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड करत होते आणि त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावत होते. मुकेश गुप्ता (ठाण्यात क्लास चालवतो), जितेंद्र गुप्ता (बीएचएमएस करत असून दुसऱ्या वर्षात आहे) आणि नटखट उर्फ प्रिन्स कुमार ( बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात आहे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
मिलिंद भरांबे यांनी सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासात दोन कोटीचा आकडा समोर आला आहे, पण हा आकडा वाढूही शकतो. तपासादरम्यान पोलिसांना समजलं की, आरोपीचे एका व्हिडीओमागे दोन ते तीन हजार रुपये खर्च अश्लिल व्हिडिओ युटयुबवर होत होते. त्या एका व्हीडीओच्या माध्यमातून आरोपी सुमारे ५० हजारांपर्यंत कमावत होते. ही टोळी मुलीना अभिनयाच्या नावाखाली बोलावत असे. त्यांना अभिनयासाठी ५०० ते १५०० रुपये देत असत. यानंतर ते अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी त्यांना सार्वजनिक ठिकाणी जसं की बॅण्ड स्टॅण्ड, रॉक गार्डन, कार्टर रोड, आणि बीएमसीच्या काही मैदानात घेऊन जायचे. तिथे हे व्हिडीओ शूट करुन ते यूट्यूबवर अपलोड करायचे. या व्हिडीओंना लाखों व्हीव्हस मिळायचे, याद्वारे आरोपींनी कोट्यवधी रुपये कमावले.

अटक केलेल्या आरोपीपैकी एक मुकेश गुप्ता हा ठाणे जिल्ह्यात क्लास घेतो. तो अभ्यासात हुशार होता आणि २००८ मध्ये दहावी बोर्ड परीक्षेत तो ठाणे जिल्ह्यात अव्वल आला होता. तपासात समोर आलं आहे की, त्याच्याकडे शिकणाऱ्या मुलांचाही त्याने व्हिडीओसाठी वापर केला, ती मुलं अल्पवयीन आहेत. एका आरोपीने तर एक मॅनेजरही ठेवला आहे, जो चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांकडून कलाकार मागवत असे आणि त्यांना संपूर्ण भूमिका समजावत असे. यानंतर मुलीला अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी तयार केलं जात असे. त्यांचा एक व्हिडीओ जास्तीत जास्त १० ते १५ मिनिटांचं असतो. पोलिसांना आतापर्यंत अशा १७ यूट्यूब चॅनलबाबत माहिती मिळाली आहे, ज्यावर त्यांनी ३०० पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत. पोलिसांनी अशाप्रकारचे अश्लील चॅनल्सही बंद करण्याची विनंती यूट्यूबला केली आहे आणि या प्रकरणी अधित तपास करत आहेत. प्रतिनिधी – उमेश मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com