मुंबई: ताळेबंदीमध्ये शिथीलता आल्यावर उपनगरीय व मेलगाडीने प्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने, तसेच ताळेबंदीमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने परिणामी गुन्हयाचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हयांना प्रतिबंध होऊन प्रवाशांच्या सुरक्षेकरीता मा. पोलीस आयुक्त, श्री. कैसर खालीद साहेब व मा. पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग मुंबई श्री. प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस ठाणे अभिलेखावरील दाखल गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. एम. ए. इनामदार यांनी अभ्यास करून पोलीस ठाणे हद्दीत नियुक्त पोलीस अंमलदार यांना सतर्कपणे गस्त करुन गुन्हे प्रतिबंध करुन दाखल गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रं. २२३ / २०२१ कलम ३९२ भादंवि सहकलम १४७, १६२ भारेका प्रमाणे दाखल गुन्ह्यातील महिला फिर्यादी नामे ज्योतीकुमारी अजित सिंग, वय २५ वर्ष, व्यवसाय आयुर्वेदीक कन्सलटंट, राह. न्यु नेव्ही नगर, कुलावा, मुंबई या दिनांक १७/०७/२०२१ रोजी अप चर्चगेट स्लो लोकलचे मधले महिलांचे जनरल जनरल डब्यात सीटवर बसुन माहीम ते चर्चगेट असा प्रवास करीत असताना नमुद लोकल १७.२५ वा. चे सुमारास दादर रेल्वे स्टेशन (पश्चिम) फलाट क्रमांक ०२ वर येवुन थांबुन सुरु होताच गुन्ह्यातील अटक आरोपी नामे मंगेश गोविंद जाधव. वय ३५ वर्षे, राह. प्लाइ सिनेमागृहा समोरील फुटपाथ, दादर (प) मुंबई. मुंबई फिरस्ता) याने अचानक पाठीमागुन येवुन फिर्यादी यांचे हातातील ३३,०००/- रु. किं. चा एक सॅमसंग कंपनीचा मॉ. क्रं. ए ८ प्लस मोबाईल फोन जबरीने खेचुन फलाटावर उडी मारुन जिन्यावर प्रवाशांचे गर्दीत चढून पळुन जात असताना महिला फिर्यादी या लोकलचे दरवाजात येवून मोठ-मोठ्याने चोर-चोर असे ओरडल्या असता फलाटावर कर्तव्यकामी नियुक्त व गस्त करीत असलेल्या महिला पोलीस हवा. २९८६ वैशाली विलास गुरव यांनी नमुद आरोपीस पाटलाग करुन त्यास ताब्यात घेतले. फिर्यादी महिला यांनी पोलीस ठाणेत हजर राहुन दिले तक्रारीवरुन वरिल प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद गुन्ह्यात आरोपीस अटक करुन दोन पंचासमक्ष गुन्ह्यातील चोरीस गेला मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेला आहे.
मा. वरिष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे उपरोक्त महिला पोलीस हवा. २९८६ वैशाली विलास गुरव यांनी कर्तव्यावर हजर राहुन पीक अवर्समध्ये सतर्कपणे गस्त करुन, महिलाविरोधी गंभीर गुन्ह्यातील पळुन जाणारे आरोपीस रंगेहाथ पकडुन जनमानसात रेल्वे पोलीसांची प्रतिमा उंचावली असुन त्याबाबत त्यांचा मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक व स्टाफ यांचे वतीने पोलीस ठाणेत पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आलेला आहे.
सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली मपोहवा. २९८६ वैशाली विलास गुरव यांनी अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.