साकीनाका पोलीस ठाणे हद्दीत गांजा चा मोठा साठा हस्तगत

साकीनाका पोलीस ठाणे हद्दीत संघर्षनगर,चांदीवली,मुंबई येथे मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाचा साठा असलेबाबत गोपनीय माहीतीगाराद्वारे सपोनि. पाडवी यांना खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्यानुसार पोलीस निरीक्षक बुधन सावंत, सपोनि.लिलाधर पाटील, सपोनि सोहम पाडवी, सपना मच्छिंद्र जाधव, पोउपनि भारत वाघे, पोउपनि.ढवण, पोउपनि.दगडे,पो.हवा. क.३१६३१/ पाटील, पो.ना.क.०३. २०२/भुवड,पो.शि.क.०३.११६३/पवार, पो. शि.क.०७०५४०/सरपाते,पो.शि.कर.०९ २११२/सुशिल कदम,पोशि.क. ०८१०८१/ तडवी तसेच एटीसी.पथक या पथकाने उपयुक्त माहीती प्राप्त करुन इमारत क.१०/एच.संघर्ष नगर,चांदीवली येथे छापा घतला असता एकुण ३४५ किलो ५२५ ग्रॅम गांजा किं.अं..रु.५१,८२,८७५/ हस्तगत करण्यात आला.तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातुन आरोपीबाबत माहीती प्राप्त करुन आरोपीचा शोध घेउन आरोपी नामे अशोक माणिक मेत्रे, वय ३९ वर्षे यांस अटक करण्यात आली असून मा.पोलीस उप आयुक्त डॉ.श्री.महेशवर रेड्डी, परिमंडळ १०, मुंबई,मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.नागरे,साकीनाका विभाग,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री. बळवंत देशमुख,साकीनाका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर नमुद पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आसून साकीनाका पोलीस ठाणे विशेष स्थानिक गुन्हे नोंद क.०४/२०२१ कलम ८(क),२० (ब)(ii)(क) अंमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com