इंदिरा नगर(मुंबई) मध्ये सराईत गुन्हेगारांकडून १०,००० रुपयांची मागणी, आरोपी रंगेहात पकडले

In Indira Nagar (Mumbai), Rs 10,000 demanded from criminals in Sarai, accused caught red handed

सदर गुन्ह्यातील फिर्यादी मोहम्मद मुस्तफा शफीक शेख, वय ३१ वर्षे ,यांचे इंदिरा नगर परिसरामध्ये पानबिडी शॉप चे दुकान आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी अन्वर मोहम्मद सिद्दीकी मलिक ४१ वर्षे, व अखिल शफिक (लल्लन )खान ४३ वर्षे, हे दोघे यांना सदर दुकानांमध्ये गुटखा विक्री ठेवत असल्याची मागील एक महिन्यापासून धमकी देत होता. सदर वेळी मुस्तफाने यांच्या दुकानांमध्ये कोणतीही गुटका विक्री करीत नसल्याचे आरोपींना सांगितले. सदर गुन्हामध्ये मुस्तफा यांना पोलिसांकडून अटक करण्याची धमकी देऊन सदर बाबत १०,०००/_ रुपयांची मागणी केली. या रोजच्या प्रकाराला कंटाळून मुस्तफा यांनी पोलिसांची मदत घेण्याचे ठरविले. सदरची रक्कम फिर्यादी यांनी आरोपी अन्वर मोहम्मद सिद्दीकी मलिक व अखिल शफिक (लल्लन ) खान यांना देत असताना यशस्वी सापळा रचून वर नमूद दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली . सदर आरोपीताकडून सापळा पूर्व पंचनामा अंतर्गत नोंद करण्यात आलेले २ हजार रुपयांचे ५ चलनी नोटा असे एकूण १०,००० रुपये आरोपीता कडून पंचनामा अंतर्गत जप्त करण्यात आल्यावर शाहूनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६३ / २०२० कलम ३८४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील आरोपी अन्वर हुसेन मोहम्मद सिद्दीकी मलिक, वय ४१ वर्षे, हा सराईत गुन्हेगार आहे. याचा गुन्ह्याचा अभिलेख पुढील प्रमाणे. १) पंतनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४८ / २००६ कलम ३८४,३४ भादवी २)मुंबई सेंटर रेल्वे पोलीस गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५ /२०१३ कलम ३२८ ,४२०, ४६७ , ४६८, १९६, २६३, १८८, १७० ,२६ ,६९, २६,(२)(४).
सदरची कारवाई ही शाहूनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पो. नि. संजय जाधव ,पो.उप. नि. वैभव कदम( गुन्हे प्रकटीकरण अधिकारी )व गुन्हे प्रकटीकरण पथक यांच्यामार्फत करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पो.उपायुक्त परिमंडळ ५ श्री. प्रणय अशोक सो. यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com