पुण्यात तब्बल 5 कोटी किंमतीचं तरंगतं सोनं जप्त…

पुणे : सोन्यापेक्षाही (gold) महाग समजल्या जाणारी व्हेल माशाची (Whale fish) उलटी (Ambergris) तस्करीचं प्रकरण पुण्यात समोर आलं आहे. पुणे वनविभागाने (Pune Forest Department) धडाकेबाज कारवाई करत ही उलटी जप्त केली आहे. या उलटीची अंदाजे किंमत तब्बल 5 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे. पुणे वनविभागाची ही पहिली मोठी कारवाई समजली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्बरग्रीस ही एक असा पदार्थ आहे जो स्पर्म व्हेल माशाच्या (Whale fish) पोटात तयार होतो. एम्बरग्रीस हे समुद्रात तरंगताना अनेकदा आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांत एम्बरग्रीसची तस्करी करण्याचे अनेक प्रकार भारतात आढळून आले आहेत. असंच प्रकरण पुणे वनविभागाने पूर्णानगर पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आणलं आहे.
पूर्णानगरमध्ये व्हेलची उलटी विक्री करण्यासाठी अज्ञात इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा व वनकर्मचारी यांची बनावट ग्राहक बनवून पाठवण्यात आले आहे. त्यावेळी आरोपी मुहमदनईन मुटमतीअली चौधरी, योगेश्वर साखरे, अनिल कामठे, कृष्णात खोत, ज्योतिबा जाधव, सुजाता जाधव अशी आरोपींची नाव आहे. यासर्व आरोपींना व्हेल माशाची उलटी विक्री करत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. या उलटीचा उपयोग हा अत्तर तयार करण्यासाठी करण्यात येणार होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com