मुंबई : अकरावीत शिकणाऱ्या पाच कॉलेज विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणी विनयकुमार शंभू राय या २० वर्षांच्या तरुणाला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ८ डिसेंबरला दादरच्या शिवाजी पार्कमधील नामांकित सभागृहात एका कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमलेनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी एक नाटक बसविले होते. त्याचा सराव सुरू असतानाच आरोपीने पाच मुलींना अश्लील स्पर्श करून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्याध्यापिकेने शुक्रवारी शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार केली होती. राय याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला विशेष सेशन कोर्टाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरुवातीला एका मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. तिने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याने इतर चार मुलींशी हेच कृत्य केले.