मुंबई : धारावी पोलीस ठाणे यांची झूम मिटिंग उत्तमरित्या पार पडली धारावी पोलीस ठाण्याचे ए टी सी अधिकारी पी. एस. आय. श्री. राजेंद्र चव्हाण आणि पोलीस नाईक श्री. गणेश इघे यांनी नवनिर्वाचित नेमणूक झालेल्या विशेष पोलिस अधिकारी यांना करावयाची कामे व व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाईन मीटिंग साठी असलेल्या नागरिक, समाजसेवक या सर्वांचे त्या त्या परिसरातील प्रश्न नोंदवले गेले. व त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच काही महिलांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत, अमली पदार्थ सेवन करणाऱ्या टोळक्यांची दिवसागणिक संख्या वाढत आहे, हे कोरोनापेक्षा भयानक आहे. कारण नशा ही कोणतेही वाईट गुन्हा घडवण्यासाठी प्रवृत्त करते, त्यावर अंकुश व वचक ठेवणे गरजेचे आहे अशी विनंती केली. सदर मीटिंग साठी श्री संदीप कदम, संतोष लिंबोरे, अलका साबळे, उत्तम खरात, दत्तात्रय शिंदे, तानाजी परब, रुपेश नेटके, मारियाम मॅडम, बाबाजी घूले, संतोष भोसले, मधुकर गुरव, मंगेश शिंदे, राम मूर्ती स पी, संतोष गोठणकर, चंद्रकांत पोटे, अनिल गजभिवं, गीता स्वामी, अलका जठार, भीमराव धुळप व उमेश मुरकर हे मान्यवर उपस्थित होते.