मुंबई : आज दिनांक ७ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेना महिला आघाडी संयुक्त युवती युवासेना यांच्या मार्फत पोलीस आयुक्त ऑफिस येथे , पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व पोलीस सह – आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्याकडे भाजप आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी ताई पेडणेकर यांच्या विरोधात पत्रकार परिषदेत अवाच्य भाषेत टीकास्त्र करून अपमान केला होता .एका महिलेसाठी ते सुद्धा ज्या मुंबईच्या प्रथम नागरीक आहेत अश्या महिले बाबत अश्या संदर्भात बोलणे योग्य नाही. या गोष्टीचा निषेध म्हणून आज पोलीस आयुक्त ऑफिस येथे त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान (कलम) ५०० व ५०९ याच्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेळी उपनेत्या विशाखा ताई राऊत, मीनाताई कांबळी, युवासेना सचिव दुर्गाताई भोसले शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य सुप्रदाताई फातर्पेकर, शीतलताई शेठ, उप सचिव रेणुकाताई विचारे, अश्विनीताई पवार तसेच शिवसेना नगरसेविका उपस्थित होत्या.