मुंबई : धारावी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांनी आज धारावीतील विशेष पोलीस अधिकारी (SPO) पदावर निवड झालेल्यांची एक छोटेखानी भेट घेतली. त्यावेळी उपस्थित मान्यवर व पोलीस अधिकारी यांच्यात कारोना परिस्थिती कशा प्रकारे नियोजन व त्यास होणारी अडचणींवर कसे काम करावे लागेल या विषयी चर्चा झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांनी आपल्या दलातील पोलीस अधिकाऱ्यांची ओळख करून देताना एक कर्तव्य दक्ष अधिकारी अतुल राजाराम ढोले यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द सांगताना म्हणाल्या की आज दिनांक ८ मे रोजी स्वतःचे लग्न ठरलेले असताना कारोना परिस्थितीची जाण राखून बारामतीच्या सुपुत्राने आपला लग्न समारंभ रद्द करून ते धारावी पोलीस ठाण्यात कामावर रजू होऊन, आज कर्तव्य पालन करीत आहेत, त्यांची पहिली पोस्टिंग सध्या मुंबई धारावी येथे आहे. बॅच नं ११८ चे अतुल राजाराम ढोले यांनी ट्रेनिंग चा अनुभव सांगताना सांगितले की लॉक डाऊन मुळे १५ महिन्याच्या खडतर प्रशिक्षण काळात एकही दिवस घरी जाण्यास मिळाले नाही. पोलीस उपनिरीक्षक या पदी धारावी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. आजच्या काळात असे उदाहरण व समाजहित फार क्वचित पहावयास मिळते. प्रतिनिधी- उमेश गजानन मुरकर
One thought on “आधी लगीन कोंढाण्याचे, आपल्या कर्तव्य निष्ठेतून व स्वकृतीमधून समाजाला संदेश देणारे सामान्यातील असामान्य असे अतुल राजाराम ढोले”
Comments are closed.
Never give up