खेरवाडी पोलीस स्टेशनच्या टीमने चातुर्याने दोन दिवसात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

मुंबई : एका रिक्षावाल्याने रिक्षातुन वाकोला येथुन घरी परत येत असताना शासकिय वसाहत बि.नं. ६ चे समोर, दक्षिण वाहिणी वरील फुटपाथ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा पूर्व या ठिकाणी एका इसमास खाली पाडुन, दोन इसम त्याचे हातातील धारधार शस्त्राने डोक्यावर चेह-यावर व हातावर सपासत वार करत होते. त्यावेळी तिसरा इसम सर्विस रोडवर स्कुटर घेवून थांबला होता. सदर घटना पाहुन फिर्यादी यांनी त्यांची रिक्षा थांबवली व त्याला नका मारु असे सांगणार, त्याच वेळी मारहाण करणाऱ्या एका इसमाने फिर्यादी यांच्याकडे रागाने पाहिले. त्यामुळे फिर्यादी घाबरून गेले व ते खेरवाडी पोलीस ठाणेत आले, त्यांनी घडलेली हकिगत पोलीसानी सागितल्याने, तात्काळ फिर्यादी सोबत पोलीस घटनास्थळी गेले. सदर वेळी जखमी इसम फुटपाथवर पडला होता व त्याचे डोक्यावर चेह-यावर व हातावर वार केल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या. म्हणुन त्यास तात्काळ औषधोपचारासाठी सरकारी वाहनाने सायन रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन त्यास दाखल पूर्व मयत घोषीत केले. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी तीन इसमाच्या विरुध्द गु.र.क्र. २१६ / २०२१ कलम- ३०२, ३४ भादवि हा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयातील मयत इसमाची व आरोपीताची ओळख पटवीणे हे पोलीसांच्या समोर आव्हान होते. त्याअनुषंगाने पोलीसांनी अहोरात्र मेहनत घेवुन चातृर्याने तपासाची चक्र फिरवुन मयत इसमाचे नाव ज्ञानेश्वर शिवप्रसाद उपाध्याय उर्फ ददु वय ३० वर्षे राठी संत ज्ञानेश्वर नगर, बांद्रा पूर्व असे असल्याचे निष्पन्न केले. तसेच तपासा दरम्यान घटनास्थळाच्या आजुबाजुचे २३ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीच्या वर्णनावरून गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीताची नावे निष्पन्न केली. पाहिजे आरोपीतांचे तपासकामी वेगवेगळी ४ पथके तयार करुन गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढुन सदर गुन्हयातील मुख्य आरोपी क्र १, नाव मुकेश सिताराम निशाद उर्फ लाला, वय २८ वर्षे यास व आरोपी क्र. २ अदिल इबरार सिध्दीकी उर्फ शालु उर्फ आरमान वय २७ वर्षे यांना दिनांक १८.०५.२०२१ रोजी अटक करून सदरचा गुन्हा
उघडकीस आणला आहे. नमुद गुन्हाच्या तपास मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०८, मुंबई श्री. मंजुनाथ सिंगे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खेरवाडी विभाग, मुंबई श्री कैलास आव्हाड यांच्या मार्गदर्शना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलीस ठाणे श्री. संजय निकुंबे, पोलीस निरीक्षक गुन्हे पाटील, पोलीस निरीक्षक बागडी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकांचे सपोनि, सचिन सुर्यवंशी आणि पांडुरंग लोणकर व त्याचे पथकांतील अंमलदार पोह. भानुदास भोसले, पोशि, गणेश बाराहाते, पोशि. रवि गायकवाड, पोशि. निखील मोरे, पोशि, प्रमोद पाळदे, पोशि. विनायक गवळी, पोशि. योगेश सटाले, पोशि. दिपक कांबळे, पोशि. प्रशांत धायगुडे पो शि. महादेव नारायणकर, पोशि. सागर चांदणे यांनी अथक परिश्रम घेवुन दिवस रात्र सातत्यपूर्ण तपास करून, सदरचा गुन्हा दोन दिवसातच उघडकीस आणला आहे. 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com