१४ वर्षीय मुलीवर २९ जणांकडून सामूहिक बलात्कार… डोंबिवलीत धक्कादायक घटना

मुंबई : डोंबिवलीत धक्कादायक प्रकार घडला आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. आरोपींमधील २६ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटत आहेत. 

राज्यात भयाचे वातावरन

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात भयाचे वातावरण तयार झाले आहे. डोंबिवली भाग जो एक शांत भाग समजला जातो तेथे ही घटना झाली आहे. राज्य सरकारने विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस म्हणाले. 

या सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांकडून स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम बनवली आहे. अद्याप ३ जण फरार आहेत तर २६ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com