

वेटलिफ्टर असलेले हा एक जुना व्हायरल फोटो आहे आणि सोशल मीडियावर याने बरेच लक्ष वेधले आहे. अलीकडे मीराबाई चानूने तिच्या घराचे आणि कुटुंबाचे नवीन छायाचित्र शेअर केले. तिने ट्वीट केले, “जेव्हा ती २ वर्षांनी घरी परतली शेवटी घरातील जेवण कराल तेव्हा तो आनंद .” याआधी तिने लिहिले आहे की, “दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर माझ्या कुटूंबाला भेटण्याची त्यांची भावना शब्दांपलीकडे आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी तुमच्या प्रत्येकाचे आभारी आहे. सर्वांचे आभार !
ना कोणता हार, ना कोणता बँडबाजा, ना शॅम्पेन च्या बॉटल, ना फटाक्यांची आतषबाजी, ना ढोल ताशे, ना घराला रंगरंगोटी आणि ना काही सजावट…
दर चार वर्षांनी होणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या ऑलम्पिक स्पर्धेत देशाला पहिलं पदक जिंकून देणारी मिराबाई चानू आज किती साधेपणाने आपल्या घरच्यांसोबत आपलं यश साजरं करत आहे.
आपल्याच घरच्यांसोबत घरी बनवलेलं साधं अन्न खाताना कोणताही गर्वाचा किंवा देशासाठी इतकी मोठी कामगिरी केल्याचा लवलेश नाही. भारतीय सेनेत सैनिक असणाऱ्या आपल्या भावासोबत केलेलं जमिनीवर पाटावर बसून केलेलं जेवण आणि घरातील साधेपणा परिस्थितीची संपूर्ण कल्पना आपल्याला देऊन जातो.
अश्या प्रतिकूल परिस्थितीतून भारतासाठी पदक जिंकणाऱ्या मिराबाई चानू ला माझा सॅल्यूट.
पत्रकार – उमेश मुरकर